प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून गेली 8 महिने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागात समन्वय साधणाऱ्या डॉ. उषादेवी कुंभार.जिल्हा सर्वेंक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. कोरोना काळात कॉटॅक्ट ट्रेसिंग ते लॅब उभारणी अन् त्यानंतर दैनंदिन अहवालाची जबाबदारी आजही त्या समर्थपणे पेलत आहे. कोरोना नियंत्रणात त्या प्रशासन आणि आरोग्य विभागातील समन्वयक म्हणून त्यांनी नवदुर्गेच्या रूपात केलेली कामगिरी म्हणूनच कौतुकास्पद ठरली आहे.
डॉ. कुंभार यांचे करवीर तालुक्यातील इस्पुर्ली हे माहेर असलेल्या अन् हातकणंगलेतील किणी वाठार हे सासर. थोडक्यात कोल्हापुरातील मातीत रूजलेल्या अन् वाढलेल्या उषादेवी कुंभार यांनी विवाहानंतर वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉ. उषादेवी गुरूपाद कुंभार यांनी विवाह झाल्यानंतर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेची पदवी घेतली. त्यानंतर 1888 पासून 2017 पर्यत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून 19 वर्षे सेवा केली. 2017 मध्ये त्यांना जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. तसेच जिल्हा परिषदेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणूनही त्यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. कोरोना काळात त्यांच्यावर जिल्हा सर्वेक्षण अधिकारी म्हणून नवी जबाबदारी पडली.
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाची साथ सुरू झाली, अन् जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. रूग्णांची वाढती संख्या अन् स्वॅब तपासणीच्या मर्यादा होत्याच. त्यातच रूग्ण सापडल्याच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन सर्वेक्षणाला सुरूवात झाली. कोरोना रूग्णांशी निगडीत राज्य, विभागीय स्तरावरून होणाऱया सर्व रिपोर्टिंगची जबाबदारी आली. जिल्हा परिषदेतील साथरोग विभागात इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम अंतर्गत आयडीएसपी सेल सुरू झाला. या कक्षातून त्यांनी स्टाफला मदतीला घेत सुरूवात केली. या सेलद्वारे कोरोना सॅम्पल तपासणीसाठी लागणाऱया लॅबची उभारणीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगदान दिले. त्यातूनच जिल्ह्यात सर्वसोयीनीयुक्त अशा कोरोना लॅब सुरू झाल्या. शेंडा पार्क येथील लॅबसह जिल्ह्यात अन्य प्रमुख ठिकाणी स्वॅब टेस्टिंगची यंत्रणा उभारण्यासाठी त्यांनी केलेली मदत महत्वपुर्ण आहे.
कोरोना साथ वैश्विक आहे. त्यामुळे जिल्हÎांतून बाहेर जाणाऱया अन् परजिल्हÎातून जिल्हÎात येणाऱयांची तपासणी, खासगी आणि शासकीय हॉस्पिटलसमधील लॅबमध्ये येणारे स्वॅब, त्याचे रिपोर्टिंग, पॉझिटिव्ह रूग्ण आल्यानंतर त्याचे कॉन्टक्ट ट्रेसिंग आणि कोरोनाशी निगडीत असलेल्या सर्व खासगी आणि शासकीय यंत्रणा, संस्थांमधील दाखल रूग्ण, डिसचार्ज रूगण, मृत्यूंशी आकडेवारी आणि केअर सेंटरशी निगडीत आयडीएसपी सेलची निगडीत जबाबदारी आजही त्या समर्थपणे पार पाडत आहेत.
कोरोनाशी निगडीत माहिती देणारे पोर्टल अद्ययावत करताना त्यांचा जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, व्हाया सीपीआर ते शेंडा पार्क असा प्रवास सुरू आहे. रोज 14 ते 15 तास काम अन् सुटीही नाही. प्रशासन आणि आरोग्य विभागात समन्वय साधताना तपासणी कीटची उपलब्धता, तांत्रिक अडथळÎांतून त्यांनी मार्ग काढले. आरटीपीसीआर लॅबच्या उभारणीत त्यांनी, त्यांच्या सहकाऱयांनी केलेली धावपळ पाहता टीमवर्क म्हणून साध्य करण्यात त्या यशस्वी झाल्या. आरटीपीसीआर लॅबमध्ये लाखांहून अधिक तपासण्या झाल्या. कोरोना नियंत्रणात आला असला तरी सारीसह अन्य साथींचे आव्हान आहे. पण प्रशासन आणि आरोग्य विभागातील समन्वयक दुर्गा म्हणून आजही प्रशासनात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.