प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता डॉ. के. त्यागराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. त्यागराजन हे सध्या सीआयडी बेंगळूर येथील आर्थिक गुन्हे तपास विभागात कार्यरत होते. त्यांची बेळगाव पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. लोकेशकुमार यांची बदली बेंगळूर येथील अंतर्गत सुरक्षा विभाग (आयएसडी) येथे झाली आहे. शुक्रवारी रात्री बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने एकूण 13 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या असून यामध्ये बेळगाव पोलीस आयुक्तांचाही समावेश आहे.