शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस यांची मागणी
दोडामार्ग/प्रतिनिधी-
साटेली – भेडशी आरोग्यकेंद्राचे डॉ. गजानन सारंग हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांची झालेली बदली तात्काळ रोखावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस यांनी केली आहे. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि डॉ. सारंग यांची ग्रामीण भागातील उत्तम सेवेची कामगिरी सांगितली. सामंत यांनी बदलीला स्थगिती देण्यासाठी सकारात्मक प्रतीसाद दिल्याचे गवस यांनी सांगितले