प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. गिजरे हॉस्पिटल, जननी ट्रस्ट व भातकांडे हायस्कूलतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून बालरोगतज्ञ डॉ. राजश्री अनगोळ उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. मंजुषा गिजरे व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बिम्सच्या मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. रूपाली शिंदे, लेकक्हय़ू हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या प्रमुख भारती चंदरगी, आया सीमा कोळी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रूपाली शिंदे यांनी कोरोना काळातील आपले हृदयद्रावक अनुभव कथन केले.