क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
तरवळे स्पोर्टस् क्लबने आयोजित केलेल्या डॉ. गोपीनाथ प्रभू सावकर स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिरोडय़ाचे माजी सरपंच संदेश प्रभूदेसाई यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी पंचसदस्य मेघा गावकर, माजी सरपंच दीपक शिरोडकर, तरवळे क्लबचे पदाधिकारी जयंत प्रभूदेसाई, देवदत्त केरकर, पद्मनाभ प्रभूदेसाई, नरसिंह शिरोडकर, जयंत गावकर, दिनेश नाईक, अजय सकपाळ, रेमेडीयो वाझ, नामदेव सावर्डेकर, जॉन्सन वाझ, हेमंत शिरोडकर, रोहिदास लोटलीकर, आगोस्तिन डायस, जितेंद नाईक, बॉस्तेंव वाझ, देवेंद्र नाईक, अनंत नाईक, निकलाव वाझ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संदेश प्रभूदेसाई म्हणाले गेली चाळीस वर्षे तरवळे क्लब क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेमधून अनेक खेळाडू घडले आहेत. या मैदानावर खेळून काही खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आयपीएल स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. या स्पर्धेमधून आणखीन उच्च दर्जाचे खेळाडू घडावेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद्मनाभ प्रभूदेसाई यांनी केले. रेमेडीयो वाझ यांनी आभार मानले.