जयसिंगपूर /प्रतिनिधी
येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित बी फार्मसी महाविद्यालयाला नुकतीच मान्यता मिळाली. यातून औषध निर्माण शास्त्र पदवीचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. नवी दिल्लीच्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून ट्रस्टच्या आणखी एका नव्या संस्थेला मान्यता मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे (रायगड) यांची संलग्नीकरण लाभलेल्या या महाविद्यालयात २०२०-२१ पासून प्रवेशाला प्रारंभ होणार असल्याची माहिती, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम यांनी दिली.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट ध्ये पूर्वीपासून सुरु असलेल्या औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी फार्मसी) विभागाबरोबरच शंभर प्रवेश क्षमतेचा पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे. अभ्यासक्रमासाठी आवश्यक अद्ययावत प्रयोगशाळा, उपकरणे, पुस्तके, जर्नल्स, क्रिडा साहित्य तसेच उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रमाचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिपक मुदगल यांनी केले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षात लवकरच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र महाविद्यालयात सुरु करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी संबंधित अधिकार कक्षांचे संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम उपाध्यक्षा, नगरसेविका, अॅड. सोनाली मगदूम यांनी आभार मानून महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. सचिन निटवे, प्राचार्य डी. के. कोथळी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.