मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी घेतले अंतिम दर्शन
प्रतिनिधी /राय
दैवज्ञ समाज, मडगावचे अध्यक्ष डॉ. दिलीप वेर्णेकर यांच्यावर मंगळवारी दुपारी मडगावच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने डॉ. वेर्णेकर यांचे मडगावात निधन झाले होते. डॉ. वेर्णेकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या नुवे येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी भेट दिली.
नुवेचे आमदार विल्प्रेड डिसा (बाबाशान), फातोर्डाचे माजी आमदार तसेच मडगावच्या रवींद्र भवनाचे अध्यक्ष दामू नाईक, दैवज्ञ समाज, मडगावचे माजी अध्यक्ष मनोहर रायकर, अतुल वेर्लेकर, माजी उपाध्यक्ष रमाकांत रायकर, कासरपाल येथील श्री देवी महामाया कालिका संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र वेर्लेकर, माजी अध्यक्ष परेश रायकर, चिदानंद बोरकर, नुवे लायन्स क्लबचे पदाधिकारी, डॉ. देश प्रभुदेसाई, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, वेर्णा येथील श्री महालसा देवस्थानाचे अध्यक्ष कमलाक्षी नायक, डॉ. दामोदर लोटलीकर, डॉ. रेडकर, चार्टर्ड अकौटंट गौतम वेर्लेकर, उल्हास ज्वेलर्सचे विक्रम वेर्लेकर, सुवर्णलक्ष्मी सहकारी पतपेढीचे सचिव सतीश साळकर, डॉ. प्रेमानंद वेर्णेकर, डॉ. दत्ता वेर्णेकर, डॉ. महाबळेश्वर रायकर, डॉ. देश प्रभुदेसाई, नुवे भाजपा पदाधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्मशानात शोकसभाही घेण्यात आली. अनेक मान्यवरांनी या शोकसभेत डॉ. वेर्णेकर यांच्या कार्याचे कौतूक करणारी थोडक्यात भाषणे केली.