जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
नवबैद्ध, अनुसुचित जातीतील शेतकऱयांसाठी ही योजना आहे. याअंतर्गत नविन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, इलेक्ट्रीक मोटरपंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वीजन जोडणी, शेततळे अस्तरीकरण आदींसाठी अनुदान दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला, दीड लाखांपर्यत उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा दाखला, सातबारा आठ अ उतारा, ग्रामसभा ठराव, आधार कार्ड, बँक खाते नंबर ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत तर https://mahadbtmhait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहेत.