कुंडल / वार्ताहर
कुंडल ता पलुस येथे थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा “क्रांतीअग्रणी पुरस्कार” बैरागड( मेळघाट) येथील जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र कोल्हे यांना शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते व क्रांती उद्योगसमुहाचे प्रमुख आमदार अरुण(अण्णा) लाड यांचे उपस्थितीत प्रदान करणेत आला क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड जन्मशताब्दी सोहळा समितीच्या वतीने दिल्या जाणार्या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख एक लाख रु. असे आहे.
डॉ. कोल्हे हे मेळघाट या दुर्गम भागातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवतात ते फक्त एक रुपया उपचार करतात. कसल्याही मोबदल्याचा विचार न करता समाजाप्रतीची आपली कर्तव्ये ही जोडी समर्पित भावनेने पार पाडत आहेत. स्व बापूसाहेबांच्या आचार विचाराशी सुसंगत कार्य डॉ. कोल्हे करत असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, माजी संचालक व क्रांती दुध संघाचे चेअरमन किरण लाड, अॕड. सुभाष पाटील, उदय लाड, अॕड. प्रकाश लाड, जि.प.सदस्य शरद लाड, प्रमिलाताई लाड, व्ही.वाय पाटील, रणजित लाड यांचेसह इतर मान्यवर व नागरीक उपस्थित होते.