डॉक्टर-परिचारिकांचे स्वयंस्फूर्तीने रक्तदान
प्रतिनिधी / बेळगाव
जागतीक रक्तदान दिनानिमित्त केएलई बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद मेडिकल कॉलेज व बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि डॉक्टरांनी रक्तदान केले.
याप्रसंगी राज्याचे एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. महांतेश रामण्णावर म्हणाले कोरोनामुळे रक्तदान शिबीर घेणे अनेक संस्थांना शक्मय झाले नाही. तसेच अनेकांनी लस घेतली असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. परंतु तातडीच्या शस्त्रक्रिया, डायलेसिसचे रूग्ण व गर्भवतींसाठी रक्ताची तातडीने गरज भासते.
अशावेळी डॉ. सीमा कुगे, डॉ. हर्षा कुलकर्णी, विद्यार्थीनी शुभांगी, प्रियांका खांडे, विश्ववसू पुरोहित, सुमित पाल, नाझरीन नागुर, शरद सागर, प्रसंन्ना पाटील, वैष्णवी बेहरा यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी 15 दिवसानंतर रक्तदान केले तर चालू शकते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे ते म्हणाले. डॉ. रामण्णावर चॅरिटेब ट्रस्टतर्फे सातत्याने ऑनलाईन वेबीनार घेऊन रक्तदानाबद्दल जागृती केली जाते असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. एस. व्ही. विरगी, डॉ. विठ्ठल माने, डॉ. बसवराज एस. देवागी, डॉ. गंगाधर भगवंतण्णवर, सविता कलमठ, शिवानंद खानापूर आदी उपस्थित होते.