प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत 670 क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या चिकोडी येथील प्रियंका कांबळे यांचा बेंगळूर विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख (निवृत्त) प्रा. डॉ. अण्णासाहेब रायमाने आणि पत्नी व मुख्याध्यापिका (निवृत्त) मंगला रायमाने यांनी शाल, हार व फळे देऊन सत्कार केला. डॉ. रायमाने हे चिकोडी तालुक्मयातील मूळचे अंकली गावचे रहिवासी असून ते सध्या बेंगळूर येथे स्थायिक आहेत. प्रियंका कांबळे यांच्यापूर्वी डॉ. रायमाने यांची कन्या स्नेहल रायमाने या 2013 साली यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आयएएस झाल्या असून त्या सध्या मंगळूर येथील मेस्काम येथे व्यवस्थापकीय संचालिका (एम. डी.) म्हणून सेवा बजावत आहेत. एका गरीब व गामासवर्गीय कुटुंबातील मुलगी आयएएस झाल्याचा आनंद झाला असून तिचा सत्कार करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. असे डॉ. रायमाने यांनी बोलताना सांगितले.