बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना काळात जनतेची प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल डॉ. सतीश याळगी यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या संकटात माणसे एकमेकांपासून दूर राहत आहेत. या काळात अनेकांना आजाराला तोंड द्यावे लागत आहे. सर्व नागरिकांवर वेळेवर उपचार करणे गरजेचे होते. या काळात अनेक डॉक्टरांनी पाठ फिरवली असतानाही डॉ. सतीश याळगी यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. यासाठी डॉ. सतीश याळगी यांचा श्री छत्रपती युवक संघटना शिवाजी कॉलनी, टिळकवाडी यांच्यातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. डॉ. याळगी यांनी यावेळी संघटनेचे मन:पूर्वक आभार मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध कोप्पळ, माजी नगरसेवक अनंत देशपांडे, पवन कांबळे, सागर भोसले, मनोज खांडेकर, राकेश कांबळे, प्रशांत पवार, श्रीधर घोळसे, केतन घोळसे, तेजस पाटील, स्वप्निल पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.