आनंदवाडी येथे मोहिमेचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
डोक्यावरून मैला वाहून नेणाऱया सफाई कर्मचाऱयांच्या कुटुंबांचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून आनंदवाडी येथील रमाबाई आंबेडकर सभागृहात त्याचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील प्रत्येक वॉर्डनिहाय त्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला असून सरकारकडून मिळणाऱया सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने 2005-06 मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण 383 मैलावाहू कर्मचारी कार्यरत होते, असा अहवाल आला होता. त्यांचे पुनर्वसन करणे हे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सफाई कर्मचारी समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अशा कुटुंबांचा सर्व्हे करावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार शहरातील अशा कुटुंबांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
या कुटुंबांचा सर्व्हे करण्यासाठी वॉर्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. अशा कुटुंबांचा शोध लावून त्यांना सफाई कर्मचारी फायनान्शियल डेव्हलपमेंट दिल्ली यांच्याकडून थेट कर्ज दिले जाणार आहे. कर्ज देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. याचबरोबर इतर सुविधादेखील देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या मोहिमेचे उद्घाटन महापालिका आयुक्त जगदीश के. एच., तालुका आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ, मुनीस्वामी भंडारी, दीपक वाघेला, विजय निरगट्टी, महापालिका आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले, शिल्पा कुंभार आदी उपस्थित होते. सध्या वॉर्डनिहाय सर्व्हे सुरू असला तरी डोक्मयावरून मैला वाहून नेणाऱया कुटुंबांनी संपर्क साधावा, असे आवाहन दीपक वाघेला आणि विजय निरगट्टी यांनी केले आहे.