ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. आदिल इक्बाल बट असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो सजन-बजराणी गावातील रहिवाशी आहे. चथारी येथे वाहनांची तपासणी करताना राष्ट्रीय रायफल्स आणि सशस्त्र सीमा बल या पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल, दोन मॅगझिन आणि नऊ बुलेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.
आदिल हा पाकिस्तानात बसलेला दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ मुजामिल उर्फ हारुन याच्या इशाऱ्यावर काम करत होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. या दहशतवाद्याविरोधात थाथारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.