वॉशिंग्टन / वृत्तसंस्थ
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालविण्याची तयारी डेमॉक्रेटिक पक्षाने केली आहे. ट्रंप यांच्या चिथावणीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांच्या हजारो समर्थकांनी अमेरिकन संसदेत प्रचंड दंगल केली. या हिंसाचारात 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. ही दंगल ट्रंप यांच्यामुळेच घडली असा आरोप डेमॉपेटिक पक्षाने केला. या व इतर अनेक कारणांस्तव त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्याची तयारी या पक्षाने केली आहे. महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात मांडला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ट्रंप यांना 20 जानेवारीच्या आत पद सोडावे लागणार आहे. याच दिवशी नूतन अध्यक्ष जोसफ बायडन अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यामुळे महाभियोग कारवाईला आता केवळ 11 दिवस उरले आहेत. तरीही डेमॉपेटिक पक्षाने या कारवाईची तयारी चालविली आहे. ही करवाई अमेरिकेच्या कनिष्ठ आणि वरीष्ठ अशा दोन्ही सभागृहांमध्ये करावी लागणार आहे. एक दिवसात यासंबंधी चित्र स्पष्ट होईल.