न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरून याबाबत माहिती दिली. गुरुवारी वयाच्या 73 व्या वषी न्यूयॉर्क शहरात इव्हाना यांचे निधन झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ती एक सुंदर स्त्री होती. तसेच एक उत्तम आणि प्रेरणादायी जीवन जगली असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इव्हाना ट्रम्प यांची तीन मुले डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना तिचा खूप अभिमान असल्याचेही ट्रम्प पुढे म्हणाले. इव्हाना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प टॉवरसह अनेक इमारती बनवण्यात मदत केली होती.