ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर कोरोना संकटातही मास्कला फारसे महत्व दिले नव्हते. मात्र, शनिवारी त्यांनी पहिल्यांदाच एका दौऱ्यात मास्क घातला.
ट्रम्प यांनी शनिवारी सैनिकी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी प्रथमच आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना मान्य केल्या आणि 4 महिन्यात पहिल्यांदा मास्क घातला.
दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत 33 लाख 55 हजार 781 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1 लाख 37 हजार 403 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 लाख 90 हजार 542 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 17 लाख 27 हजार 836 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 15 हजार 819 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.