तिन्ही दलांकडून ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प यांचे स्वागत केल्यानंतर ट्रम्प यांना तिन्ही सैन्यदलाकडून 21 तोफांची सलामी देण्यात आली.
ट्रम्प यांच्या भारत दौऱयाचा आज दुसरा दिवस आहे. ट्रम्प यांच्यासोबत ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जरेड यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील शिष्टमंडळ आहे. तिन्ही दलांकडून ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख येथे उपस्थित आहेत.
ट्रम्प हे भारताला भेट देणारे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. सकाळी 10.30 वाजता राजघाटावर ट्रम्प राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्यानंतर 11.00 वाजता हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट, दुपारी 12.40 हैदराबाद हाऊसमध्ये संरक्षणविषयक करारांवर स्वाक्षऱया व वृत्तपत्रांना निवेदन देण्यात येईल. सायंकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेट आणि 8.00 वाजता ते मायदेशी परतणार आहेत.