डोळ्याची पापणी लवणे किंवा डोळे फडफडणे याचा संबंध बरेचजण शुभ किंवा अशुभ संकेताशी जोडतात. मात्र ही समस्या आरोग्याशी निगडित आहे हे समजून घेतले पाहिजे.
- डोळ्यांचे स्नायू अनियंत्रित झाल्यामुळे डोळा फडफडू शकतो. सामान्यपणे हा त्रास काही वेळात आपोआप दूर होतो. मात्र दीर्घकाळापर्यंत डोळ्याचे फडफडणे सुरू राहिले तर हा त्रास डोळ्यांच्या किंवा चेहर्यांच्या स्नायूंमुळेही होऊ शकतो.
- डोळ्यांचे फडफडणे हे अनेक प्रकारचे असते. त्यामध्ये ‘बिनाईन आयलीड ट्विच’ हा एक प्रकार असतो. त्याला आयलीड मायक्रोमिनिया या नावानेही ओळखले जाते. सामान्यपणे एक डोळा पापण्यांच्या छोटय़ा स्नायूंच्या आकुंचानामुळेदेखील फडफडतो. अनेकदा कुठल्याही इलाजाशिवाय फडफडणे बंद होते.
- बिनाइन इसेंशिअल ब्लेफारोस्पॅझ्म : यामध्ये डोळ्यांच्या आजूबाजूला असणार्या स्नायूंमध्ये आखडलेपण येते. याची सुरुवात डोळे जास्त फडफडल्याने होते. अनेकदा गंभीर स्थितीमध्ये पापण्या काही तासांसाठी बंद होतात.
- हॅमीफेशिअल स्पॅझ्म : चेहर्याच्या एका भागातील स्नायू तसेच पापण्यांच्या स्नायूंमध्ये होणार्या आकुंचनामुळे होमीफेशिअल स्पॅझ्मची समस्या निर्माण होते. चेहर्यापर्यंत जाणार्या स्नायूंच्यामज्जातंतूंमध्ये काही कारणाने अनियमितता येते त्यामुळे असे होते.
- कॉर्नियामध्ये खाज निर्माण करणार्या घटकांमुळे देखील डोळे फडफडू शकतात.
– डॉ. महेश बरामदे