खादी हा प्रकार सदाबहार मानला जातो. खादीचे कुर्ते, टॉप्स, साडय़ांमध्ये महिला डौलदार दिसतात. महत्त्वाची बाब म्हणजे खादीचे कपडे कोणत्याही ऋ तूमध्ये चालून जातात. तर अशी ही खादी बॉलिवूड दिवाजनाही खूप आवडते. तुम्हीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने खादी कॅरी करू शकता.
- कंगना रनौतने मध्यंतरी खादीची निळ्या रंगाची साडी कॅरी केली होती. तिने त्यावर पिवळ्या रंगाचा राउंड नेक ब्लाऊज घातला होता. अशा पद्धतीने तुम्हीही खादीची पेस्टल रंगाची साडी नेसू शकता. अशा साडीवर सिल्व्हर किंवा ऑक्सडाईजचे दागिने शोभून दिसतील.
- विद्या बालनने पांढर्या आणि ग्रे रंगाचं मिश्रण असणारी खादीची साडी नेसली होती. विद्या या साडीमध्ये खूपच ग्रेसफुल दिसत होती. अशा पद्धतीची दोन रंगांची साडी तुमचं सौंदर्य खुलवू शकते. या साडीवर झुमके किंवा चांदबाली कॅरी करता येईल.
- करिना कपूरने खादीचा कुर्ता आणि पलाझो कॅरी केला होता. या पेहरावासोबतच कुर्त्याच्या रंगाचं जॅकेट घालता येईल. करिनाने यावर स्नीकर्स घातले होते. कॅज्युअल ऑकेजनसाठी हा ड्रेस बेस्ट ठरू शकतो. प्रवासातही तुम्ही अशा पद्धतीचा पेहराव करू शकता. खादीचे पेहराव खूपच आरामदायी असतात. खादीचा कुर्ता, साडी ऑफिसवेअरचा एक चांगला पर्याय ठरू शकतो.