सुशांतसिंह मृत्यूप्रकरण: दीपिका, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे उघड, रिया-शौविकचा जामीन अर्ज फेटाळला, 6 ऑक्टोबरपर्यंतकोठडी
प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मफत्यूप्रकरणाच्या तपासात बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची पाळेमुळे बाहेर येऊ लागली आहेत. एनसीबीच्या चौकशीत बडी अभिनेत्रींची नावे समोर आल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर आणि करिश्मा प्रकाश यांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे.
एनसीबीच्या तपासादरम्यान `डीएनएसके’ हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर डी म्हणजे दीपिका पदुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा ही नावे समोर आली आहेत. सुशांतसिंहची मॅनेजर जया साहा हिच्या क्वान या कंपनीची मॅनेजर करिश्माचे काही व्हॉट्सऍप चॅट समोर आले त्यामधून ही नावे समोर आली आहेत.
मंगळवारी सकाळपासून जया साहा हिची चौकशी एनसीबीने केली. यादरम्यान जया साहाचे वॉट्सऍप चॅट समोर आले असता, यामध्ये नम्रता जयासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. या चॅटमध्ये `मुंबईमध्ये तू मला एमडी देशील आणि त्यानंतर आपण पार्टी करु, असे वचन तू मला दिले होतेस. मला खरंच एका ब्रेकची गरज आहे’, असे एनने म्हटले आहे. याप्रकरणी करिश्माला समन्स पाठविण्यात आले असून, तिच्या चौकशीत दीपिकाचे नाव समोर येताच तिलाही समन्स पाठविण्यात येणार आहे.
रिया-शौविक 6 ऑक्टोबरर्यंत कोठडीत
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मफत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविकच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एनसीबीने केला.
सुशांतच्या शरीरात केमिकलचा अंश
दरम्यान,सुशातंच्यातपासातमहत्त्वाचाअसणाराव्हिसेरारिपोर्टअखेरसमोरआलाअसूनत्यातूनधक्कादायकखुलासाझालाआहे.सुशांतच्याशरीरातकेमिकलचेअंशअसल्याचेव्हिसेरारिपोर्टमधूनसमोरआलेआहे.केमिकलमुळेचसुशांतचामफत्यूझालाका,याचातपासहोणारआहे.सुशांतनेखरेचआत्महत्याकेलीकीत्याचीहत्याकरण्यातआलीहोती? याबाबतच्या निष्कर्षावरयेण्यासाठीव्हिसेरारिपोर्टचीमदतहोण्याचीशक्यताआहे.