ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेल्या शौविक चक्रवर्तीने शनिवारी पुन्हा एकदा विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका आदेशात म्हटले होते की, एनसीबी अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टाने स्वीकारलेला नाही, अशावेळी आरोपींना जबरदस्ती तुरूंगात ठेवता येणार नाही. या आदेशानंतर आता पुन्हा एकदा जामिनासाठी शौविकची जामीनासाठी धडपड सुरू झाली आहे.
दरम्यान, रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शौविक चक्रवर्तीने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.