मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज अढळून आले. त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती. आज सकाळी मुंबई पोलिसांनी अरमानला या प्रकरणी अटक केल्याचे समोर आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने २८ ऑगस्ट रोजी हाजी आली परिसरात छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी ड्रग्ज पेडलर अजय राजू सिंहला अटक केली. अजयची चौकशी केल्यानंतर अरमान कोहलीचे नाव समोर आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकण्यात आला असून त्याच्या घरात काही अंमली पदार्थ अढळून आले. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही काळापासून मनोरंजन क्षेत्रात अंमली पदार्थाच्या तस्करीवरून खळबळ उडाली आहे. टीव्ही आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची नावे या प्रकरणात पुढे आली आहेत. याप्रकरणी काही कलाकारांना एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला आहे.