बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपट सृष्टीत होणाऱ्या ड्रग तस्करीच्या देवाण घेवाणीच्या आरोपाखाली अभिनेत्री संजना गलराणी अटकेत आहे. दरम्यान कर्नाटक हायकोर्टाने सोमवारी अभिनेत्री संजना गलराणीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी संजनाने याचिका दाखल केली आहे.
हा आदेश मंजूर करून न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना वाणी विलास रुग्णालयात संजनाच्या वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही गुरुवारी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
शहराच्या हद्दीतील परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात संजना गलराणी, रागिणी द्विवेदी व इतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल आहे. यापूर्वी तिची जामीन याचिका ३ नोव्हेंबर रोजी कोर्टाने फेटाळली होती.