आमदार दयानंद सोपटे
पेडणे / प्रतिनिधी
वागातोर येथील रेव्ह पार्टीच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करून त्यात सहभागी असलेल्याना पोलिसांनी अटक केली आहे , त्याबद्दल पोलीस अधिकाऱयांचे अभिनंदन . मात्र विरोधक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणताही अभ्यास न करता जुन्या फोटोंचा सामाजिक माध्यामाद्वारे व्हायरल करून सरकारवर टीका करणाऱयानी ड्रग्सशी संबध जोडू नये , विरोधकांचेही कपिल झवेरी यांच्याशी फोटो आहेत , तेही फोटो सामाजिक माध्यमात व्हायरल करून आम्हीही आहोत का ड्रगच्या सोबतीला असा सवाल विरोधकांनी स्वतःला विचारावा विनाकारण टीका करणाऱया विरोधकांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची जाहीर माफी मागावी असे आवाहन आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी मांदे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले .
आमदार यांचा फोटो विषयी खुलासा
कपिल झवेरी याने आपली पर्यटन विकास महामंडळावर चेरमेनपदी झाल्यावर भेट घेवून अभिनंदन केले . त्यावेळी त्याच्या डोक्मयावर तो ड्रग्स मध्ये सामील आहे असा शिक्का लागला नव्हता असा खुलासा आमदार दयानंद सोपटे यांनी करताना आता विरोधकांनी विरोधी नेत्याबरोबर असलेले झवेरी यांचे फोटो व्हायरल करण्याचे आवाहन केले .