बेंगळूर/प्रतिनिधी
ड्रग रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या कन्नड अभिनेत्री गिनी द्विवेदी, संजना गलराणी आणि अन्य आरोपी रविशंकर, राहुल, नियाज आणि लूम पेपर सांबा यांच्या पोलीस कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली आहे. बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी कन्नड चित्रपटातील कलाकारांना ड्रग्ज पुरवल्या प्रकरणी अटक केली होती.
चित्रपट निर्माता आणि पत्रकार इंद्रजित लंकेश यांनी काही दिवसापूर्वी सीसीबीला या संदर्भात आपले निवेदन दिले होते. त्यांनी असा दावा केला की मादक पदार्थांच्या व्यापारात किमान १५ लोक सहभागी आहेत.
दरम्यान, सीसीबी पोलिसांनी आणखी एक आरोपी आदित्य अग्रवाल याला हरियाणामधून अटक केली आहे. संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तो वीरेन खन्नाचा सहकारी असून ड्रग तस्करांच्या नियमित काम्पर्कात आहे. वीरेन खन्ना यांनी अशा पार्ट्या आयोजित केल्या जिथे ड्रग्जचे सेवन केले गेले. त्याला सीसीबी पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी दिल्लीहून अटक केली होती.