मुंबई \ ऑनलाईन टीम
लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याची काय गरज आहे, असा प्रश्न वारंवार विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधानांचै फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचं केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी स्पष्ट देखील केले आहे. आता यावरूनच महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कन्या दीक्षा राऊत यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दीक्षा राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचाच फोटो आहे.
एवढ्यावर दीक्षा राऊत थांबलेल्या नाहीत तर त्यांनी आणखी एक ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोविड १९ वर जागरूकता पसरवू शकत नाही!, अशी टीका त्यांनी केली आहे.