इचलकरंजी / प्रतिनिधी
ड्राय डे दिवशी सुरू असलेल्या येथील नदिवेस नाका परिसरातील एक बीयर आणि परमिट रूम वर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात सुमारे ४ हजार रुपयांची रोकडीसह ४ मोबाईल हॅण्डसेट, एक डिव्हिआर आणी विविध कंपनीची बीयर विदेशी दारू जप्त असा सुमारे १ लाख ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली. तसेच हॉटेल व्यवस्थापकसह ४ कर्मचाऱ्यांना अटक केली ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
अटक केलेल्यांच्या मध्ये व्यवस्थापक सतीश गणपती मगदूम व २५ रा बेळगुंदी, कर्मचारी संग्राम मारुती पाटील व १८ रा कोरिवडे ता आजरा, प्रवीण दत्तात्रय देसाई, वय ३० रा उतूर ता आजरा, राहुल पांडुरंग कदम वय २७ रा किरवे ता गगनबावडा यांचा समावेश आहे.
कार्तिकी एकादशी निमिताने राज्य सरकारने गुरुवारी राज्यात दारूबंदी केली होती. तरीदेखील इचलकरंजी येथील नादिवेस नाका परिसरातील शांती बीयर बार अँड परमिट रूम अवैद्यपणे सुरू होते. याची माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार याना बातमीदाराकडून समजली त्यांनी पोलीस उप निरीक्षक रोहन पाटील पोलीस अंमलदार आबा बंडगर, बबन माळी, आरिफ वडगावे, सचिन मगदूम, नितीन जाधव, शेखर शिंदे आदींच्या मदतीने गुरुवारी रात्री त्या बीयर बार अँड परमिट रूम वर छापा टाकला.
या छाप्यात हॉटेल मधील ४ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडून अटक केली तर सुमारे १ लाख रुपये किमतीची विविध कंपनीची बीयर विदेशी दारू, ४ मोबाईल हॅण्डसेट, एक डिव्हिआर असा सुमारे १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केली. रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या दारूचा पंचनामा आणि अटक केलेल्या ४ कर्मचाऱ्यांना विरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.