एक जोडपे 43 कोटींच्या बंगल्यात करत होते विवाह, पोलिसांनी धाव घेत विवाह रोखला, पण कारवाई नाही
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका जोडप्याने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या 43 कोटी रुपयांच्या बंगल्यात विवाह करण्याची योजना आखली होती. नियोजित वर म्हणजेच होणारा नवरा बंगला पाहण्याच्या बहाण्याने तेथे अनेकदा गेला आणि छायाचित्रे काढून घेतली. ज्या महिलेचा विवाह होणार होता तिचे नाव शेनिता जोन्स आणि तिच्या होणाऱया नवऱयाचे नाव कोर्टनी विल्सन आहे.
या जोडप्याने दुसऱयाच्या घरालाच स्वतःचे ड्रीम होम मानले. एवढेच नाही तर विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर या घराचे नाव विल्सन स्टेट नमूद पेले. आश्चर्याची बाब म्हणजे या घराला जोडप्याने भाडेतत्वावरही घेतले नव्हते. मालमत्तेच्या एका वेगळय़ा हिस्स्यात राहणाऱया मालकाने विवाहासाठीची तयारी पाहून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी हा विवाह सोहळा रोखला पण कुणालाच अटक केलेली नाही. या जोडप्याचा येथेच विवाह व्हावा हा ईश्वराचा संदेश असल्याचे बंगल्याच्या मालकाने पोलिसांना सांगितले आहे.
9 बेडरुम असलेल्या या आलिशान बंगल्यात एक भव्य बॉलरुम, टू स्टोरी बार, मुव्ही थिएटर, पूल, टेनिस कोर्ट आणि डान्स स्टुडिओ देखील आहे. जोडप्याला बंगल्याचा मालक त्याच परिसरात राहतो याची गंधवार्ताही नव्हती.