प्रतिनिधी तरूण भारत संवाद / सोलापूर
चीनी वस्तूवर बहिष्कार टाका हे नुसतेच बोलायचे नाहि तर कृतीतून दाखवून द्यायचे, असा चंग बांधून सोलापूरच्या चार युवकांनी मेक इज चायनाच्या टिकटॉक ॲपला पर्याय म्हणून फिल टय़ून्स ॲप विकाfसत केले. ड्रॅगनला मेक इन सोलापूरने प्रतिउत्तर दिले. हा देशातील पहिला प्रयोग आहे.
सोलापुरात बी. ई. कॉम्युटरचे शिक्षण घेऊन वर्षाभरापूर्वीच पुणे येथील ब्लू पर्ल व कुमार्क प्रमोशन या कंपनीत शुभम स्वामी, अभिजित गुंड, कपिल म्याकल, समीर कुंदूर हे चारही युवक नोकरीला लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे ते आपल्या घरी परतले. लॉकडाऊनमध्ये छोटय़ा मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत मनोरंजनात्मक टिक-टॉक व्हिडिओ बनविण्याची क्रेझ वाढली होती. हा टिक-टॉक व्हिडिओ मेक इन चायनीज आहे, या अॅपचा सर्वाधिक वापर इंडियात होतो. दरम्यान चीन वस्तूंवर बहिष्कार टाकाचा, विविध पोस्ट सोशल मीडियावर फिरत होते. यातून त्यांना कल्पना सुचली. उपलब्ध साधनसामुग्री व सर्व्हरच्या माध्यमातून लॉकडाउनमधील वेळेचा सदुपयोग करीत महिन्याभरच्या श्रमातून फिल टय़ून्स ॲप विकासित केले. या ॲपमधून मनातील भावना व्यक्त करणार असल्याने त्याला फिल टय़ून्स असे नामकरण करण्यात आले.
11 जूनला प्ले स्टोअरमध्ये त्याचा श्रीगणेशा करण्यात आला. या युवकांनी आपले सहकारी, मित्र परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये ॲपची जनजागृती घडवून आणत आतापर्यंत 500 जणांनी अॅप डाऊनलोड केले. 100 जणांकडून त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. यातून सोलापूरचे टॅलेंट दाखविण्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर व लोकल टू होकल या अभियानास चालना देणारे प्रेरणादायी काम या चौघांनी केले आहे.
देशातला पहिला प्रयोग, प्रतिसाद द्या – शुभम स्वामी
स्वदेशी हि संकल्पना विचारात घेऊन ॲपची निर्मिती केली. स्वदेशी ॲपचा वापर सर्वाधिक करावा. त्याच उद्देशाने आम्ही टिक-टॉकला पयार्य दिला आहे. टिक-टॉकनंतर मित्रांनो ॲप उदयास आली. पण त्यावर शासनाने बंदी घातली. आता फिल टय़ून्स हा देशातील पाfहला प्रयोग आहे. त्याला भारतीयांनी प्रतिसाद द्यावा.
तिच किमया, तोच आनंद – कपिल म्याकल, बी. ई. कॉम्प्युटर इंजिनिअर
चीनच्या टिक-टॉक ॲपमधील सुविधा या ॲपमध्ये आहेत. तसाच वापर, तोच आनंद फिल टय़ून्स ॲपमध्ये मिळणार आहे. ॲपच्या नावामध्ये फरक आहे. आम्ही यशस्वी झालो, तुम्ही यशस्वी व्हा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून द्या. त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करा.
लोकल टू होकलला प्रेरणा मिळावी – समीर कुंदूर
आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी सोलापुरात नोकरी नसल्याने दुसर्या शहरात आपले बस्तान बसवावे लागते. आजची परिस्थिती पाहता कोणावर अवलंबून न राहता स्वतःची बुद्धिकौशल्य विकसित करून रोजगार निर्माण करण्याची हि खरी संधी आहे. आयटी क्षेत्रातील युवकांकडून लोकल टु होकल या अभियानास प्रेरणा मिळावी.
स्वदेशीचा वापर करा – अभिजित गुंड
विदेशी अॅपच्या माध्यमातून आपण बिलियन, मिलियनमध्ये पैसा परदेशात देतो. विदेशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करतो. जोपर्यंत पयार्य नाही, तोपर्यंत ठिक आहे. आता पर्याय उपलब्ध झाल्यास आपण स्वदेशी वापराचा अवलंब करून मेक इन इंडियाला प्रोlसाहन देणे गरजेचे आहे.