तेलंगण सरकारचा अनोखा प्रयोग
वृत्तसंस्था/ हैद्राबाद
कोरोनाविरोधी लसींचा पुरवठा राज्याच्या कानाकोपऱयात वेगवान पद्धतीने करता यावा यासाठी तेलंगणा सरकारला ड्रोनद्वारे लसपुरवठा करण्याची अनुमती मिळाली आहे. असा प्रयोग करणारे हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने तेलंगणा सरकारची यासंदर्भातील विनंती मान्य केली. लवकरच हा अनोखा प्रयोग सुरू केला जाणार आहे.
या प्रयोगाला पुढील आदेशाप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे, असे केंद्राने स्पष्ट केले. 22 एप्रिलला भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) या प्रयोगाची व्यवहार्यता तपासण्यासंबंधी केंद्र सरकारला विनंती केली होती. आतापर्यंत भारतात 15 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून लसपुरवठा करण्यामध्ये अनेक फायदे आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यांची सोय नाही आणि वाहने जाऊ शकत नाहीत, तेथेही ड्रोनद्वारे लसपुरवठा करता येणे शक्मय आहे.
हा प्रयोग तेलंगणात यशस्वी झाल्यास उत्तर प्रदेश व बिहारनेही तो करू पाहण्याची तयारी दर्शविली आहे. अशाप्रकारे लवकरच देशभरात ही नवी पद्धती रुजण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.