मोदी दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर
ऑनलाईन टीम / ढाका :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. लॉकडाऊननंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. सांस्कृतिक आणि कटूनितीच्या दृष्टीने मोदींचा बांग्लादेश दौरा महत्वपूर्ण मानला जातो.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या निमंत्रणानुसार 26, 27 मार्चच्या या दौऱ्यासाठी मोदी आज सकाळी बांग्लादेशमध्ये दाखल झाले आहेत. ढाका येथील विमानतळावर शेख हसिना यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी ढाक्यातील सावर येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट दिली. तिथे त्यांनी वृक्षारोपणही केले.
बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला तसेच बांग्लादेशचे जनक शेख मुजीबूर रहमान यांच्या जयंती कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदींनी गुरुवारी म्हटले होते की, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत कोरोना, सांस्कृतिक तसेच कटूनितीच्या इतर मुद्यांवर सविस्तर चर्चा करणार आहे. या शेजारी देशाला भेट देण्याचा विशेष आनंद आहे.