ऑनलाईन टीम / श्रीनगर :
काश्मीरच्या तंगधर परिसरात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरक्षा दलांनी उधळून लावली. यावेळी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, तसेच हेरॉइनची सहा पाकिटे जप्त करण्यात आली. बाजारात या हेरॉइनची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे कुपवाडा पोलिसांनी लष्कराच्या 7-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) आणि बीएसएफच्या 87 बटालियसह ही कारवाई केली. तंगधर भागातून एक एके-47 रायफल, दोन ग्रेनेड, हेरॉइनची सहा पाकिटे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या हेरॉइनची किंमत बाजारात जवळपास 30 कोटी रुपये आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात सुरक्षा दलांनी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे नार्को टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या प्रकरणात दहशतवाद्यांचे 10 मदतनीसही पकडले गेले.