प्रतिनिधी / कोल्हापूर
कोतोली येथील वनरक्षक लाचप्रकरणीतील तक्रारदाराने संबंधीत वनरक्षकाऐवजी वनरक्षक म्हणून मित्राबरोबर चर्चा करुन, वनरक्षकानेच लाच मागितल्याविषयी संभाषणाचे खोटे डिजीटल व्हाईस रेकॉर्डींग केले होते. या डिजीटल व्हाईस रेकॉर्डमधील आवाज कोतोलीच्या वनरक्षकाचा नसून या लाचप्रकरणामधील तक्रारदारांच्या मित्राचा असल्याचे पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवाल स्पष्ट झाले. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी तक्रारदार अभिमन्यु अर्जुन पाटील (वय 35, रा. बांदीवडे, ता. पन्हाळा) आणि त्याचा मित्र अमित बाळासो येडगे (वय 27, रा. कणेरी पैकी धनगरवाडा, ता. पन्हाळा) या दोघाविरोधी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.