अक्कलकोट : प्रतिनिधी
अंकलगी-तडवळ रोडवर तडवळ, ता. अक्कलकोट येथे २३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ५६ हजार १५० रूपयाचा गुटखा पकडला. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिनियम कलम २६(२) अन्वये गुन्हा दाखल झाला. आरोपी चंद्रशेखर ईरणा वस्त्रद उर्फ स्वामी व नागम्मा चंद्रशेखर वस्त्रद उर्फ स्वामी दोघे रा. तडवळ, यांच्या वर गुन्हा दाखल झाला. फिर्याद सोलापूर चे अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिली.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपीने अन्नसुरक्षा आयुक्त, मुंबई यांनी जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने अन्न सुरक्षा अधिनियमवरील कलमानुसार फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. यामध्ये १९ हजार आठशे रूपयाच्या गोवा गुटक्याचे १६५ पाकीटे, ६६०० रूपयाची हाय गुटख्याची ५५ पाकिटे,१२ हजार रूपयाचे विमल पान मसाला १०० पाकिटे, ३००० रूपयाची व्ही वन तंबाखूची १०० पाकिटे, बाराहजार रूपयाचे सुपर जेम पान मसाल्याची १०९ पाकिटे, ७५० रूपयाची तंबाखूची ५० पाकिटे तसेच २००० रूपयाची तयार माव्याचे दोनशे पाकिटे असे एकुण ५६ हजार १५० रूपयाचा माल मिळुन आला. अधिक तपास सपोनि काकडे हे करीत आहेत.