प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन दोन आयुक्त, सहाय्यक नगररचनाकार, शहर अभियंत्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्यात चालढकल आणि बांधकाम व्यावसायिकाला त्रास दिल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश बजावले आहेत.
तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पी शिवशंकर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. अतिक्रमण काढण्यात चालढकल आणि बांधकाम व्यावसायिकाला त्रास दिल्याच्या प्रकरणी गेल्या काही काळापासून जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने तत्कालीन दोन आयुक्त, सहाय्यक नगररचनाकार, शहर अभियंत्या विरोधात अटक वॉरंट जारी केले.
बिदरी ह्या सध्या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत