प्रतिनिधी /बेळगाव
ग्राहकांना प्रसन्न वातावरणात उत्तम सेवा देता यावी, या हेतूने देशातील सर्वात मोठा ज्युवेलरी बँड असणाऱया टाटा समूहाच्या ‘तनिष्क’ बँडच्या नव्या दालनाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. खानापूर रोडवरील कृष्णाई आर्केड येथे या दालनाचे उद्घाटन कॅरेटलेन बोर्ड मेंबर संदीप कुलहळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच टायटन या घडय़ाळाच्या दालनाचे उद्घाटन कंपनीच्या रिजनल बिझनेस मॅनेजर रेवथी रंगन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तनिष्कचे बिझनेस मॅनेजर वासुदेव राव तसेच तनिष्कच्या बेळगाव शाखेचे संचालक संतोष चांडक उपस्थित होते.
बेळगावमध्ये 2016 मध्ये तनिष्कची सुरुवात झाली. ग्राहकांनी तनिष्कला उत्तम प्रतिसाद दिल्याने प्रशस्त अशा जागेत अधिक चांगली सेवा देता यावी, या हेतूने हे दालन सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना संदीप कुलहळ्ळी म्हणाले, तनिष्कचे हे कर्नाटकामधील 34 वे दालन आहे. प्रशिक्षित कारागीर आणि चोख व्यवहार यामुळे तनिष्कने नेहमीच पारदर्शकतेवर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. नवे दालन अत्याधुनिक असून पूर्वीप्रमाणेच बेळगावकर तनिष्कला प्रतिसाद देतील याची आम्हाला खात्री आहे.
तनिष्कचे रिजनल बिझनेस मॅनेजर वासुदेव राव यांनी तनिष्कमध्ये नवता आणि परंपरा यांचा मेळ घालून दागिने उपलब्ध आहेत. विवाह संकल्पनेवर आधारित विशेष दागिने येथे उपलब्ध आहेत. पारंपरिक दागिन्यांबरोबरच आधुनिक तरुणींच्या पसंतीस उतरतील, असे दागिने येथे पहावयास मिळतील, असे सांगितले.
रेवथी यांनी टायटनचे हे 53 वे दालन सुरू करताना आनंद होत असून 1500 हून अधिक घडय़ाळांचे नमुने येथे उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय बँडची घडय़ाळे येथे खरेदी करता येतील, असे सांगितले. ‘खरेदी करा अथवा न करा या दालनात येणारी प्रत्येक व्यक्ती समाधानाने बाहेर पडेल,’ असा आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संतोष चांडक यांनी सर्वांचे स्वागत करून या तनिष्कमध्ये दागिने खरेदीबरोबरच ‘गोल्ड एक्स्चेंज केले जाते व बेळगावच्या या दालनाने सर्वाधिक गोल्ड एक्स्चेंज केले आहे, असे सांगितले. त्यांच्याच हस्ते संदीप कुलहळ्ळी, रेवथी, वासुदेवन या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना चांडक, वृंदा व पियुष चांडक, घनःशाम, मोहन व किशोर चांडक तसेच डॉ. जवळी, बोपण्णा, विनय बेहरे, श्रीनारायण, विजयकुमार व राजेश हेडा, रमेश मुंदडा, विजय जाजू, राधेशाम तापडीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.