बेळगाव : कर्नाटक राज्य टेबलटेनिस संघटना आयोजित राज्य अग्रमानांकित टेबलटेनिस स्पर्धेत 11 वर्षाखालील कॅडेट गटात तनिष्का कपिल काळभैरव व रैनेश जलान यांनी विजेतेपद पटकावले.
मल्लेश्वरम येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम रावने अभिनव प्रसन्नाचा 7-11, 11-9, 11-8, 11-9 तर रैनेश जलानने तांमगोना एम. याचा 11-9, 11-3, 11-6 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात रैनेश जलानने प्रथम रावचा 11-5, 11-3, 13-11 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात राषी रावने के. व्ही. अनुशा हिचा 7-11, 11-6, 11-1, 11-2 तर दुसऱया उपांत्य सामन्यात तनिष्का कपिल काळभैरवने अनित मारिना हिचा 11-6, 11-4, 11-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात तनिष्क काळभैरवने राषी रावचा 11-4, 11-6, 11-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तनिष्का कपिल काळभैरव व रैनेश जलानी यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.