प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी सलग दुसऱया दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सरासरी दीडशेने कमी झाली आहे. मंगळवारी कोरोनाने 19 जणांचा मृत्यू झाला तर 484 जण कोरोनामुक्त झाले. नवे 406 कोरोना रूग्ण दिसून आले आहेत. शहरात गेल्या तीन दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा शंभरांवर होता तो मंगळवारी 96 वर आला. त्यामुळे ऍंटीजेन टेस्टची संख्या वाढल्याने येत्या काही दिवसांत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या हळूहळू कमी होत जाणार असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने 19 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये शहरातील 5 जणांचा समावेश आहे. येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये राजेंद्रनगर येथील 60 वर्षीय वृद्ध, सम्राटनगर येथील 57 वर्षीय पुरूष, चंदगड तालुक्यातील तावरेवाडी येथील 78 वर्षीय वृद्ध, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील 80 वर्षीय वृद्धा, लक्षतीर्थ वसाहत येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी जवाहरनगर येथील 52 वर्षीय पुरूष, पाटील हायस्कूल परिसरातील 78 वर्षीय वृद्धा, लालनगर येथील 64 वर्षीय वृद्ध, कमला नेहरू कॉलनीतील 70 वर्षीय वृद्ध, हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील 70 वर्षीय वृद्ध, कोरोची येथील 80 वर्षीय वृद्ध, पट्टणकोडोली येथील 79 वर्षीय वृद्ध, कोरोची येथील 56 वर्षीय पुरूष, शाहूनगर येथील 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये कदमवाडी येथील हॉस्पिटलमध्ये शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय वृद्ध, कसबा बावडा येथील 52 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील 52 वर्षीय पुरूष, रंकाळा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील 62 वर्षीय वृद्ध आणि शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये गारगोटी येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या 19 मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 439 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 159, नगर पालिका क्षेत्रात 160, कोल्हापूर शहरात 104 तर अन्य 16 बळींचा समावेश आहे.
आजअखेर 8 हजार 80 जणांना डिस्चार्ज
मंगळवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 734 अहवाल आले. त्यापैकी 364 निगेटिव्ह तर 266 पॉझिटिव्ह आहेत. तसेच 84 प्रलंबित असून 16 नाकारले आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगच्या 805 प्राप्त अहवालापैकी 665 निगेटिव्ह तर 140 पॉझिटिव्ह आहेत. सायंकाळपर्यत एकूण 406 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आजअखेर 15 हजार 679 पॉझिटिव्हपैकी 8 हजार 80 जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या 7 हजार 160 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
सायंकाळपर्यंत आलेल्या 406 पॉझिटिव्ह रूग्णांत आजरा 15, भुदरगड 11, चंदगड 2, गडहिंग्लज 14, हातकणंगले 76, कागल 1, करवीर 48, पन्हाळा 11, राधानगरी 10, शाहूवाडी 8, शिरोळ 17, नगर पालिका क्षेत्र 93, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 94 व इतर 6 असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नगर पालिका व् महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 264, भुदरगड 335, चंदगड 464, गडहिंग्लज 406, गगनबावडा 38, हातकणंगले 1687, कागल 280, करवीर 1697, पन्हाळा 493, राधानगरी 399, शाहूवाडी 403, शिरोळ 760, नगर पालिका क्षेत्र 3206, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 4853 असे 15 हजार 285 आणि इतर 394 असे 15 हजार 679 रुग्ण आहेत. जिह्यातील एकूण 15 हजार 679 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 8 हजार 80 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 439 जणांचा मृत्यू झाल्यामुळे उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 7 हजार 160 इतकी आहे.