व्हिडिओ पाहून लोक झाले अचंबित
इंटरनेटवर हजारो व्हिडिओ पहायला मिळतात, पाही काही व्हिडिओज पुन्हा पुन्हा पाहण्यासारख्या असतात. याचमुळे त्यांना पाहणाऱयांची संख्या लाखोंच्या घरात जाते. सध्या टर्किश शेफ बुराक ऑज्देमीरचा एक व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. या व्हिडिओत तो भर वाळवंटात फ्रायम्स तळताना दिसून येतो.
हा व्हिडिओ पाहिल्यावर दंग व्हायला होते. दूर-दूरपर्यंत फैलावलेल्या वाळवंटात चूल पेटवून कुणी स्वयंपाक करू शकतो हा विचारही कुणी केला नसेल. बुराक ऑज्देमीर यांनी मात्र हे करून दाखविले आहे. याचमुळे हा व्हिडिओ आगीप्रमाणे इंटरनेटवर फैलावत असून आतापर्यंत याला 98 दशलक्ष ह्यूज मिळाले आहेत.
विशाल आकाराची कढई
व्हिडिओ दुबईच्या वाळवंटात तयार करण्यात आला. सर्वप्रथम मोठमोठय़ा विटांच्या मदतीने शेफ एक चूल तयार करतो, आणि त्यानंतर त्यात आग पेटवितो. चुलीवर कढई ठेवून त्यात खाद्यतेल ओतण्यात येते. तेल गरम होताच शेफ स्वतःच्या दोन मित्रांच्या मदतीने यात रंगबिरंगी फ्रायम्सचा पॅन उलटा करतो. काही सेकंदातच हे फ्रायम्स तळून तयार होतात.
सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद
बुराक यांनी स्वतःचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. वाळवंटात स्नॅक्स तळण्याची त्यांची ही पद्धत लोकांना अत्यंत पसंत पडल्याने आतापर्यंत याला 9.8 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. 5.4 दशलक्ष लोकांनी याला लाइक केले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ 17 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. शेफ बुराक स्वतःच्या अनोख्या पाककला कौशल्यासाठी ओळखला जातो.