ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलीसांनंतर आता ईडीने त्यांच्या विरोधात मनी लाऊण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हा दाखल आहे. आता ईडी तबलिगी जमातीला दिल्या जाणाऱ्या फंड बाबत चौकशी करणार आहे. मौलाना साद यांच्यासोबत अजून नऊ जणांची चौकशी ईडी करणार आहे.
मरकजमध्ये हजारो नागरिक राहत होते. त्यांच्यासाठी फंड कुठून आणला जातो. भारतातील अनेक राज्यातून किती लोक येत असतात. त्यांचा खर्च कसा केला जातो. त्यांच्या प्रवासाचा खर्च कोण करतो आदी प्रश्न तसेच तबलिगी जमातीसाठी विदेशातून पैसा पुरवला जातो का ? या सर्व प्रश्नांची चौकशी ईडी करून केली जाणार आहे.