ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पर्यटनाच्या नावाखाली व्हिसा घेऊन दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 विदेशी नागरिकांना भारताने काळ्या यादीत टाकले आहे. तसेच त्यांचा भारतीय व्हिसाही रद्द करण्यात आला आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 960 विदेशी नागरिक पर्यटनाच्या नावाखाली व्हिसा घेऊन धार्मिक कार्यात व्यस्त असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले. तसेच त्यांचा भारतीय व्हिसादेखील रद्द करण्यात आला असून त्यांच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.