- कोरोनामुळे समजले योगाचे महत्व
ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात राज्य शासनाने टाळेबंदी जाहीर केली. मात्र तीन महिन्यांनी यात शिथिलता मिळाली. त्यानंतर बाजारपेठा फुलल्या, टप्प्याटप्प्याने उद्योग, हॉटेलसाठी नियमावली जाहीर करून ते सरू करण्यास सरकारने परवानगी दिली. परंतु योग सेंटर बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र गेल्या सात महिन्यांपासून बंद असणारे योग सेंटरस् आता सुरु झाले आहेत. तसेच पुण्याच्या कोथरूड परिसरातील ‘योग ऊर्जा’ हा योग सेंटर ही सुरु झाला आहे. येथे राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. सेंटर मध्ये योग्य ती खबरदारी जसे की निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे इ.
यावर योग प्रशिक्षक व योगऊर्जाच्या संस्थापिका देवयानी एम. म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात लोकांना फिटनेसचे महत्त्व अजून जास्त जाणवले आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे प्रमाणही वाढले. आता सरकारने योग सेंटर चालू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने, संपूर्ण नियमावलीचे पालन करून ‘योग ऊर्जा’ मध्ये आम्ही हळू हळू पूर्व स्तिथीत येण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सेंटरमध्ये सदस्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतती जात आहे.”
कोरोनाच्या काळात फिटनेस व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला मात्र आता फिटनेस व योग सेंटर पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. गेले अनेक दिवस योग सेंटर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या सदस्यांना ऑनलाइन आसने व प्राणायामचे प्रशिक्षण देत होते. मात्र आता सेंटर चालू झाल्यामुळे सदस्यांना अधिक चांगल्या पद्धतीने योग सराव करता येणार आहे व या कोरोनाच्या काळात अधिक तंदुरुस्त व निरोगी राहता येणार आहे. जे सदस्य योगाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ‘योगाऊर्जा’ ने लाइव्ह ऑनलाइन क्लासची सुविधाही चालू ठेवलेली आहे.
येथे जनरल फिटनेसबरोबरच लाइफस्टाईल डिसऑर्डर जसे – ओबेसिटी, झोपेचे त्रास, पोटाचे विकार, श्वासाचे विकार, वरचेवर सर्दी, इन्फेक्शन व ऍलर्जीचा त्रास, पिसिओडी, पाठदुखी, थायरॉइड, हॉर्मोनचे असंतुलन, मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब, मायग्रेन, सायटिका, ऍसिडिटी, फिशर अशा सामस्यांवर योग थेरपीच्या माध्यमातून काम केले जाते. भारतातूनच नाही तर परदेशातूनही योग शिकायला येथे अनेक जण येतात व इंटरनेटच्या माध्यमातून कित्येक देशांमध्ये आज ‘योग उर्जा’ पोहोचत आहे. येथे योग प्रशिक्षकही तयार होऊन यशस्वी कामगिरी करत आहेत.