प्रतिनिधी/ बेळगाव
किणी (कोवाड) ता. चंदगड येथील प्रगतशील शेतकरी तम्मान्ना गणपती बिर्जे (वय 84) यांचे रविवार दि. 20 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. ‘तरुण भारत’ जाहिरात मांडणी विभागप्रमुख अशोक बिर्जे याचे ते वडील होत. रक्षाविसर्जन मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.