ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे झाली तरच निवडणुकीतील पराभव मान्य करेन, अशी तयारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली आहे. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅली मॅकनॅनी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अनेक प्रांत टपालाद्वारे मतदान करण्यावर आग्रही आहेत. या मतदान पद्धतीवर ट्रम्प यांनी शंका व्यक्त केली होती. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास निकाल सहजासहजी मान्य करणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी निवडणूक स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे झाली तरच निकाल मान्य करू असे म्हटले आहे.
कॅली यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास ट्रम्प मान्य करतील. मात्र, डेमोक्रॅटिक पक्ष हा निकाल मान्य करणार नाही.