क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
अंतिम लढतीत तरवळे क्रिकेट क्लबचा 14 धावानी पराभव करून एमएलटी संघाने मडकई युवक संघाने आयोजित केलेल्या पहिल्या पंचायत आणि नगरपालिकास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिंकली.
मडकई पंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात एमएलटी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या डावात 18 षटकात सर्वबाद 161 धावा केल्या. त्यांच्या सनी काणेकरने 33 चेंडूत 52 तर सूरज सावळने 17 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानंतर एमएलटीच्या गोलंदाजानी तरवळे क्रिकेट क्लबला 18 षटकात 8 बाद 148 धावान रोखले. तरवळेच्या राजन धामसेकरने 28 तर सय्यद बडिजुम्माने 44 धावा ठोकल्या.
अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार एमएलटीच्या सनी काणेकरला तर उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार अमोघ प्रभुदेसाईला मिळाला. बक्षीस वितरण मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते आणि जीसीएचे सचिव विपुल फडके यांच्या उपस्थितीत झाले.