प्रतिनिधी/ बेळगाव
एका तरुणाने तब्बल 72 वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून प्रशिक्षण दिले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या जवळून 18 हजार 800 रुपये दंडही वसुल केला आहे.
स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती ट्वीट केली आहे. आरीफ जमादार (वय 28) नावाच्या तरुणाने 2019-20 मध्ये एकूण 72 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आले आहे. म्हणून त्याला ताब्यात घेवून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी करणे, हेल्मेट नसताना दुचाकी चालविणे, एकेरी वाहतुकीचे नियम मोडणे आदी प्रकार त्याने केले आहेत. गुरूवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोठा दंड वसुल केला आहे व प्रशिक्षण देवून त्याला समजही देण्यात आली आहे.