नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांच्यावर सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता.2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता
नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मे 2014 पासून तरुण तेजपाल जामीनावर बाहेर होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.
देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. अखेर 21 मे रोजी तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.