प्रतिनिधी / दापोली
दापोली येथील सुरेश जोशी यांची भारतीय ग्रीन अपंग क्रिकेट संघात निवड झाली आहे. जोशी हे तरूण भारतचे वेळवी वार्ताहर असून सध्या ते महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
जोशी यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्ली, मध्य प्रदेश व राजस्थान येथील आयोजित अंपग व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत कर्णधार रमेश सरतापे याच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेर स्टेडियम स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले होते. यामध्ये स्पर्धेत सुरेश जोशी यांने दमदार फलंदाजी केली होती. याच बळावर डिसेंबर 2021 मध्ये दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड इंडिया यांच्या वतीने चॅलेंजर ट्रॉफी अंपग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. मध्ये सहभागी इंडीया ग्रीन संघात सुरेश जोशी याची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत इंडीया ब्लू, इंडीया रेड, इंडीया ऑरेंज, इंडीया ग्रीन या चार संघाचा सहभाग होणार आहे. रत्नागिरी जिह्यातून सुरेश जोशी यांची एकमेव निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.