- मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याने मनसे, शिवसेना आक्रमक
ऑनलाईन टीम / मुंबई :
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिॲलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानू याने मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्यानंतर मनसेने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
या शोमध्ये जान कुमार सानूने मला मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भात वक्तव्य केले यावर बोलताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झाले, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले, असे देखील खोपकर यांनी म्हटले आहे.
- … अन्यथा आंदोलन करू : प्रताप सरनाईक
दरम्यान, या वक्तव्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झालेली दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील जान ला या स्पर्धेतून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. तसेच या शो मधून जान सानू ची हकालपट्टी केली नाही तर, सेट वर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.